मुख्याध्यापक संदेश

मुख्याध्यापक संदेश

मी सौ सुरेखा सुधाकर दारोळे भिकुसा हायस्कूल, सिन्नर मधील मुख्याध्यापिका या नात्याने सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांना शुभेच्छा देते तसेच शाळेतील सर्व समितीतील सदस्यांना विश्वासात घेवून शालेय विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. भिकुसा हायस्कूलला उज्वल यशाची परंपरा आहे. शाळेला २० जून २०१८ रोजी ५० वर्ष पूर्ण झाले असून भिकुसा हायस्कूलने जनमाणसात आपले स्थान टिकवून ठेवले आहे. राजकीय व सामाजिक, शैक्षणिक तसेच वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात आमच्या विद्यार्थानी नावलौकिक मिळविला आहे. नुकत्याच झालेल्या क्रिडास्पर्धेत कु. कशिश शरद डगळे हिने राज्यस्तरावर डॉजबॉल स्पर्धेत विजय मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. मी सर्वांना आव्हान करते की सर्व सिन्नरकरांनी भिकुसा हायस्कूल मध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देवून त्यांचा विकास करण्याची संधी आम्हास द्यावी.

धन्यवाद!!!

मुख्याध्यापिका
सौ. एस. एस. दारोळे