शाळा बद्दलची माहिती

गोखले एज्युकेशन सोसायटीचे, सेक्रेटरी डॉ.मो.स गोसावी (सर) यांच्या प्रेरणेने तसेच मा.जगन्नाथ शेठ भिकुसा व श्री.भानुदास शेठ क्षत्रिय यांच्या सहकार्याने २०जुन १९६८ रोजी भिकुसा हायस्कूलची स्थापना झाली. विडीकामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची गावातच व्यवस्था केली .आपल्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गावातच सोय व्हावी ह्या निर्मळ आणि उदात्त हेतूने विद्यालयाची स्थापना झाली.प्रथम गावातील जुन्या इमारतीत वर्ग भारत होते.१९७५ पासून नवीन इमारतीत हि वर्ग भरू लागले. नवीन इमारत बांधण्यासाठी मा. जगन्नाथ शेठ  व श्री.भानुदास शेठ यांनी बी.वाय.के.फर्म मधून भरघोस देणगी दिली. इमारतीचा पाया भरणी बी.वाय.के कॉलेजच्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले. नवीन ळइमारतीचे  अप्रतिम बांधकाम श्री.मधुकरराव निराळी यांनी करून घेतले.

प्रथम मुख्याध्यापक श्री. मुनोत यांनी अवघ्या १३विदयार्थी संख्येवर इयत्ता ८वी चा वर्ग सुरु केला.त्यानंतर श्री.सुहास राजदरेकर ह्यांनी विद्यालयाची घडी व्यवस्थित बसवून ५ वी ते १० चे वर्ग चालू केले.नंतर श्री. ल.ग.घटे व राष्ट्रपती पदक विजेते मुख्या.श्री.पी.एस.गंगावणे यांचा कालखंड विद्यालयाचा सुवर्णकाळच होता.

शाळेची स्थापना :- २० जून १९६८

शाळेचे देणगीदार : श्रीमान भिकुसा यमासा क्षत्रिय