मुख्याध्यापक संदेश

मुख्याध्यापक संदेश

मी श्री.सोमनाथ शंकर जगदाळे ‘भिकुसा हायस्कूल, सिन्नर’मधील मुख्याध्यापक या नात्याने सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांना शुभेच्छा देतो,तसेच शाळेतील सर्व समित्यांतील सदस्यांना विश्वासात घेवून शालेय विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. भिकुसा हायस्कूलला उज्वल यशाची परंपरा आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी व दिवंगत सेक्रेटरी डॉ.मो.स गोसावी (सर) यांच्या प्रेरणेने तसेच मा. जगन्नाथशेठ भिकुसा व श्री. भानुदासशेठ क्षत्रिय यांच्या सहकार्याने २०जुन १९६८ रोजी भिकुसा हायस्कूलची स्थापना झाली. विडीकामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची गावातच व्यवस्था केली.आपल्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गावातच सोय व्हावी ह्या निर्मळ आणि उदात्त हेतूने विद्यालयाची स्थापना झाली. प्रथम गावातील जुन्या इमारतीत वर्ग भरत होते.१९७५ पासून नवीन इमारतीत वर्ग भरू लागले. नवीन इमारत बांधण्यासाठी मा.जगन्नाथशेठ व श्री.भानुदासशेठ यांनी बी.वाय. के. फर्म मधून भरघोस देणगी दिली. इमारतीची पायाभरणी बी.वाय. के कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले. नवीन इमारतीचे अप्रतिम बांधकाम श्री. मधुकरराव निराळी यांनी करून घेतले.

प्रथम मुख्याध्यापक श्री. मुनोत यांनी अक्च्या १३विदयार्थी संख्येवर इयत्ता ८वीचा वर्ग सुरु केला. त्यानंतर श्री. सुहास राजदरेकर ह्यांनी विद्यालयाची घडी व्यवस्थित बसवून ५ वी ते १० चे वर्ग चालू केले.नंतर श्री. ल.ग.घटे व राष्ट्रपती पदक विजेते मुख्याध्यापक श्री. पी. एस. गंगावणे यांनी विद्यालयाला सुवर्णझळाळी दिली.

आज शाळेला ५४हून अधिक वर्ष झाली आहेत. शाळेतील विध्यार्थीसंख्या वाढत आहे. शाळेत विविध उपक्रम, कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे, जयंत्या, पुण्यतिथ्या, पालकमेळावे, विध्यार्थीमेळावे योगवर्ग थांतून विद्यार्थ्यांच्या पर्यायाने शाळेच्या प्रगतीचा आलेख वृद्धिंगत होत आहे.

शाळेची स्थापना :- २० जून १९६८
शाळेचे देणगीदार : श्रीमान भिकुसा यमासा क्षत्रिय